stitcherLogoCreated with Sketch.
Get Premium Download App
Listen
Discover
Premium
Shows
Likes
Merch

Listen Now

Discover Premium Shows Likes

Coffee, Cricket Aani Barach Kaahi

276 Episodes

28 minutes | Feb 4, 2023
Meet Sayali Naik: Delhi Capitals' dietitian and Suryakumar Yadav's nutritionist
२०११ वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्याआधी दोन दिवस सचिन तेंडुलकर फक्त दही-भात खात होता. विराट कोहली जेवताना प्रत्येक गोष्ट मोजून मापूनच घेतो; पाणी सुद्धा ठरवून दिलेलं असतं, तेवढंच घेतो. या गोष्टी ते काटेकोरपणे पाळतात त्यांच्या आहारतज्ञाच्या सांगण्यावरून. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींना क्रीडापटूच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. "पडद्यामागील शिलेदार" चा भाग हा पैलू उलगडून दाखवण्यासाठी आहे. आघाडीच्या क्रीडा आहारतज्ञ सायली नाईक, ज्यांनी अनेक क्रीडापटू, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू, सूर्यकुमार यादवसारखा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आणि आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्ससह काम केल्याने ह्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी सायलीपेक्षा चांगला तज्ञ क्वचितच मिळेल.At a time when the whole sports ecosystem is being more aware about the nutritional aspect, cricketers are leading the pack. In "Padadyamageel Shiledaar", let's meet leading sports nutritionist Sayali Naik and know the importance of her field for professional cricketers. Having worked with multiple athletes, First Class cricketers, international cricketers including Suryakumar Yadav and IPL franchise Delhi Capitals, who better than Sayali to shed light on the crucial aspect for a sportsperson.
9 minutes | Feb 2, 2023
Tendulkar व Warne ने रोवली Border-Gavaskar Trophy ची मुहुर्तमेढ
भारत वि ऑस्ट्रेलिया. २१ व्या शतकातील कसोटी क्रिकेट जगतातील कदाचित सर्वात अटीतटीचा सामना. जरी ह्या दोन्ही देशांमधल्या मालिकेचं नामकरण १९९६ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असं केलं गेलं तरी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला ग्लॅमर आलं, आणि दोन देश एकमेकांच्या जवळ आले. गौरव जोशी, जो २५ वर्षांहून जास्त काळ ऑस्ट्रेलियात राहतो, तो आपल्याला घेऊन जात आहे भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा दोन सुपरस्टार्समुळे - आणि एक मैदानाबाहेरील शिलेदारामुळे - हा सामना प्रस्थापित झाला.    India vs Australia. Perhaps the fiercest rivalry in the world of Test cricket in the 21st century. Although the series between the two countries was renamed the Border-Gavaskar Trophy in 1996, the India-Australia series became glamourous since the early 1990s, paving the way for the two nations to be drawn closer. Gaurav Joshi, who has lived in Australia for over 25 years, takes us through the early days of the India-Australia cricket journey, when two superstars - and an off-field stalwart - established the rivalry.
17 minutes | Jan 31, 2023
Aditya Tare: Mumbai to Ranji Trophy knockouts via Uttarakhand
मुंबईचे रणजी ट्रॉफीमधील आव्हान संपुष्टात आले असले तरी मुंबईच्या शेवटच्या रणजी-विजेत्या कर्णधाराचे - आदित्य तरेचे - आव्हान मात्र अजूनही शाबूत आहे. ह्या हंगामात उत्तराखंडसाठी खेळताना आदित्यने त्यांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या भरारीत मोलाची कामगिरी बजावली आहे. बलाढ्य कर्नाटकाशी लढायला सज्ज होताना आदित्यने त्याच्या व संघाच्या प्रवासाबद्दल CCBK शी गप्पा मारल्या     Mumbai's Ranji Trophy challenge may have ended, but the challenge of Mumbai's last Ranji-winning captain - Aditya Tare - is still intact. Playing for Uttarakhand this season, Aditya has been instrumental in their run to the quarterfinals. Aditya chats with CCBK about his and the team's journey as they prepare to take on the mighty Karnataka
9 minutes | Jan 28, 2023
Ajinkya Rahane on मुंबई क्रिकेट and domestic cricket
मुंबईचा अजून एक रणजी ट्रॉफी हंगाम अजिंक्यपदाविना संपला. अजिंक्य रहाणे संपूर्ण हंगाम कर्णधारपदी असूनही. ह्याचा अर्थ मुंबईचे क्रिकेटर्स रणजी ट्रॉफी खेळण्यात कमी पडतात? का पुढच्या पिढीला मुंबईसाठी झुंजण्याची इच्छाशक्ती नाहीये? आणि एकंदर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये काय बदल करायला हवे? हे सर्व प्रश्न आम्ही विचारले खुद्द अजिंक्य रहाणेलाचMumbai's Ranji Trophy title-drought has extended by yet anyoehr season. That too, despite Ajinkya Rahane captaining the side for the entire season. Does this mean that Mumbai cricketers lack the skills of playing First Class cricket? Or has the Gen Next lost taking pride in wearing Lion's Crest? And what are the changes required in overall domestic cricket circuit? We asked all these questions to Ajinkya Rahane 
15 minutes | Jan 25, 2023
CCBK Special, WPL - महिलांची IPL - संघांसाठी पैशांची उधळण
 कोण आहेत महिलांच्या IPL - ज्याचं नाव विमेन्स प्रीमियर लीग असणार आहे - मधील संघमालक? सर्व संघमालक IPL मधीलच आहेत? नक्की काय विचार आहे WPL मध्ये गुंतवणूक करण्यामागे? कधी होणार आहे पहिली WPL, आणि त्याची ऑक्शन? संघमालकांनी पैशांची उधळण केल्यानंतर काहीच तासांत पडद्यामागच्या घडामोडी सांगत आहेत आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर 'CCBK स्पेशल' मध्ये        Who are the team owners in the Women's IPL - titled as the 'Women's Premier League'? Are all team owners from the IPL owners' club? Why is market so upbeat on investing in WPL? When will the first WPL, and its auction, happen? Hours after the BCCI received a windfall through sale of franchises, Aditya Joshi and Amol Karhadkar reveal the behind-the-scenes events in 'CCBK Special'
17 minutes | Jan 23, 2023
Saaptahik CCBK, Arch-rivals मुंबई and महाराष्ट्र in must-win Ranji Trophy game
 मुंबईसाठी पृथ्वी शॉची उणीव भासणार आहे. तीच गत महाराष्ट्राची राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांच्याबाबतीत. तरीही रणजी ट्रॉफी स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे, कारण तो जवळजवळ 'नॉकआउट गेम'च  आहे. जो संघ जिंकेल तो उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. तसेच, विदर्भाला - राज्यातील तिसरा संघ - बाद फेरीत स्थान मिळवण्याची काही संधी आहे का? आदित्य जोशी आणि अमोल कर्‍हाडकर मारत आहेत गप्पा "साप्तहिक CCBK" मध्ये Prithvi Shaw will be missing for Mumbai. Ditto with Rahul Tripathi and Ruturaj Gaikwad for Maharashtra. Still, there will be no love lost between Mumbai and Maharashtra in the last league game of the Ranji Trophy. The game is, after all, a virtual knockout clash. The team that wins will go trough to the quarterfinals. Also, does Vidarbha - the third team from the state - have any chance of making it to the knockouts? Aditya Joshi and Amol Karhadkar preview it in "Saaptahik CCBK"
9 minutes | Jan 21, 2023
CCBK Special, कधी लागणार Sarfaraz Khan ची Team India मध्ये वर्णी?
 त्याचं वजन बघा. त्याचा फिटनेस बघा. त्याचा यो-यो टेस्टचा स्कोर बघा. हि सगळी कारणं एकीकडे दिली जात असताना सर्फराझ खान मात्र त्याच्या धावांनी आणि त्याच्या मैदानावरील कामगिरीने भारतीय कसोटी संघाचा दरवाजा नुसता ठोठावत नाही, तर तोडायचा प्रयत्न करत आहे. नक्की काय कारण आहे ज्याने निवड समिती अजूनही त्याला घेत नाहीये संघात, पाहूया अमोल कऱ्हाडकरांकडून 'CCBK स्पेशल' मध्ये      Look at his weight. Look at his fitness. Look at his Yo-Yo test score. Putting all these reasons - or excuses aside -  Sarfaraz Khan continues to knock on the door, in fact has been on the verge of breaking it open, of the Indian Test team with his runs and performance on the field. What exactly is the reason why the selection committee is still not picking him in the squad? Let's hear it from Amol Karhadkar in 'CCBK Special'
15 minutes | Jan 17, 2023
Saaptahik CCBK, Will Virat Kohli surpass Sachin Tendulkar's record of 100 hundreds?
विराट कोहली वर्ल्ड कप २०२३ च्या आधी ५० ODI शतकांचा पल्ला पार करेल? त्याहूनही महत्त्वाचं, खरंच कोहली सचिन तेंडुलकरांचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडू शकेल? कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी भारतासाठी किती महत्त्वाची आहे? आणि केएल राहुल व अक्षर पटेलची जागा नयूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कोण घेऊ शकेल? पाहूया 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर ह्यांच्या गप्पा  Will Virat Kohli cross the 50 ODI hundreds' mark before the 2023 World Cup? Moreover, does he have it in him to go past Sachin Tendulkar's record of 100 hundreds in international cricket? Besides Kohli, how significant was Kuldeep Yadav and Mohammed Siraj's performance with the ball against Sri Lanka? Who will come in for KL Rahul and Axar Patel for the series against New Zealand? Let's hear it from Sunandan Lele and Amol Karhadkar in 'Saaptahik CCBK'  
14 minutes | Jan 14, 2023
CCBK Special, Why Prithvi Shaw isn't considered for Team India
रणजी ट्रॉफीमधील विक्रमी ३७९ धावांच्या खेळीने पृथ्वी शॉ पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. ह्या खेळीने उघडेल पुन्हा भारतीय संघाचा दरवाजा शॉसाठी? नक्की कारणं काय आहेत ज्यामुळे पृथ्वीला गेली ४ वर्षे कसोटी संघातून डावललं जात आहे? खरंच मैदानाबाहेरील कारणांमुळे शॉची मैदानावरील कामगिरी झाकोळली जात आहे? पाहूया आदित्य जोशी सादर करत असलेल्या 'CCBK स्पेशल' मध्ये     Prithvi Shaw has hit the headlines for the right reasons after his record-breaking innings of 379 in the Ranji Trophy. Will it help him break the door into the Indian team again? Why has he been ignored for most of the last four years despite emerging as a Boy Wonder? Aditya Joshi tells us in 'CCBK Special"
15 minutes | Jan 10, 2023
Saaptahik CCBK, Bumrah's failed comeback bid; Will Suryakumar Yadav get a chance in ODIs?
 जसप्रीत बुमराहचं पुनरागमन व्हायच्या आधीच फिस्कटलं. कसा हाताळायला हवा  बुमराहचा मुद्दा? आणि अक्षर पटेलने T२० व ODI क्रिकेटमध्ये तो रविंद्र  जाडेजापेक्षा सरस असल्याचं दाखवून दिलं आहे. सुर्यकुमार यादवची श्रीलंकेविरुद्ध ODI मालिकेसाठी संघात जागा होऊ शकेल? आणि ईशान किशनचं काय होणार? ह्या सर्व मुद्द्यांवर 'साप्ताहिक CCBK' मध्ये चर्चा करत सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर त्यांचं ODI मालिकेचं भाकित करत आहेत. तुमचं प्रेडिक्शन आम्हाला नक्की सां
18 minutes | Jan 7, 2023
फ्री हिट - CCBK मुक्तपीठ, Ten India pace bowlers you should watch out for
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि उम्रान मलिक तर आहेतच, परंतु भारताच्या जलदगती गोलंदाजीचा ताफा येणाऱ्या काळात चालू ठेवणारे १० गोलंदाज निवडले आहेत संदीप जगे ह्यांनी. संदीप, जे अलिबाग परिसरातील सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक आहेत, त्यांनी त्यांच्या आवडीचे दहा गोलंदाज निवडले आहेत जे येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवू शकतील. तुमचे टॉप-१० सुद्धा आम्हाला कळवा.   हा आहे आपल्या "फ्री हिट - CCBK मुक्तपीठ" सदरातील पहिला दृकश्राव्य भाग. आजवर फ्री हिट अंतर्गत CCBK परिवारातील सदस्यांनी लिहिलेले लेख आपण प्रसिद्ध केले आहेत. तुम्हीदेखील ५ ते १५ मिनिटांचा तुमच्या पसंतीच्या विषयावरील व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकाल. निवडक भाग आम्ही नक्की प्रसारित करू. रेकॉर्डिंग साधनांबाबतीत शंका असल्यास आधीच ई-मेल करा
11 minutes | Jan 3, 2023
Saaptahik CCBK, IND v SL: Focus on Hardik Pandya, Washington Sundar in T20I series
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेकडून आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढेल? कुठल्या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल नजर T२० मालिकेत? पाहूया आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर ह्यांचे विश्लेषण "साप्ताहिक CCBK" मध्ये
19 minutes | Dec 31, 2022
CCBK Explainer, Indian cricket's heroes and zeroes of 2022
२०२२ च्या सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघाकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु प्रत्यक्षात मात्र रसिकांच्या दृष्टीने निराशा झाली. राहुल द्रविडसारखा माजी खेळाडू प्रशिक्षक आणि पाच वेळा आयपीएल जिंकलेला कर्णधार रोहित शर्मा यांची जोडी अजून तरी कमाल करू शकलेली नाही. २०२३ मध्ये तरी आपण मॉडर्न क्रिकेट खेळायला लागू आणि नवीन निवड समिती संघामध्ये आवश्यक ते बदल करण्याची धमक असणारी असेल या आशेवर २०२३ सुरूवात करूया. तोपर्यंत पाहूया २०२२ मधील भारतीय पुरुष व महिला क्रिकेट संघामधील 'हिरो' आणि 'झिरो' 'बी. यु. भंडारी प्रस्तुत CCBK एक्स्प्लेनर' म
16 minutes | Dec 27, 2022
Saaptahik CCBK, Time running out for KL Rahul and Rahul Dravid? ft Sunandan Lele
बांगलादेशविरुद्ध रडतखडत जिंकलेल्या मालिकेने २०२२ चा शेवट जरी गोड झाला असला तरी ह्या वर्षात भारतीय क्रिकेटवरील विविध प्रश्नचिन्ह कायम राहिली आहेत. केएल राहुलला कसोटी संघातून वगळायची वेळ आली आहे का? आणि विराट कोहलीचं काय? संघ व्यवस्थापनाला कठोर भूमिका घ्यावी लागेल? ह्या मुख्य पप्रश्नांवर चर्चा करताना 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये  सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर देत आहेत भारतीय पुरुष व महिला संघांना २०२२ च्या कामगिरीचे गुण
15 minutes | Dec 21, 2022
Saaptahik CCBK, Hot picks at the IPL Auction 2023
२३ डिसेंबरला होणाऱ्या लिलावात १० संघ मिळून २०६ कोटींची उधळण करू शकतात. त्यातील सर्वात जास्त बोली लागू शकणारे १० लक्षवेधी खेळाडू - ५ परदेशी व ५ भारतीय देशांतर्गत खेळाडू - तुमच्यासमोर मांडत आहे अमोल कऱ्हाडकर 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये  
14 minutes | Dec 18, 2022
CCBK बोल फुटबॉल - Who will win the FIFA World Cup final?
 २०२२ चा वर्ल्ड कप अर्जेन्टिना किंवा फ्रान्स कोणीही जिंकले तरी एका अर्थाने विजय हा कतारचाच होणार आहे. कारण लिओनेल मेस्सी आणि किलियन एम्बापे हे दोघंही कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट ग्रुप ची मालकी असलेल्या पी.एस.जी ह्या संघाकडून खेळतात आणि साहजिकच ह्या अंतिम सामन्याचं मुख्य आकर्षण असणार आहेत आणि मेस्सीचा हा वर्ल्ड कप मधला अखेरचा सामना आहे हे नक्की..
14 minutes | Dec 17, 2022
CCBK Explainer, How does IPL Auction operate?
२०२३ च्या इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामाची खरी सुरुवात डिसेंबर २३ ला होणाऱ्या ऑक्शनने होत आहे. लिलावाआधी नक्की ऑक्शनच्या आधी आणि लिलाव चालू असताना संघमालक व अधिकारी करतात काय, हे माहित आहे तुम्हाला? जाणून घेऊया आदित्य जोशीकडून "बी. यु. भंडारी प्रस्तुत कॅचबक एक्स्प्लेनर" मध्ये
21 minutes | Dec 13, 2022
Saaptahik CCBK, Enigmatic Ishan, daredevil Devika and unsung hero Unadkat
ईशान किशनच्या विक्रमी खेळीचं महत्त्व काय? आणि भारताच्या महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला रोखण्यात एका पुणेकराचा मोलाचा वाटा आहे, माहीत आहे ना? त्याचबरोबर बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत कोणाचं पारडं असेल जड? आणि रणजी ट्रॉफीच्या ८८व्या हंगामाचं काय आहे वैशिष्ट्य? पाहूया 'बी. यु. भंडारी प्रस्तुत साप्ताहिक CCBK' मध्ये  
31 minutes | Dec 10, 2022
CCBK Special, Ruturaj, Rajvardhan and record run: Ankeet Bawane relives Maharashtra's memorable campaign
ऋतुराज गायकवाडची तडाखेबंद फलंदाजी आणि इतर खेळाडूंच्या झुंजार खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने नुकत्याच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. उपकर्णधार अंकीत बावणे, ज्याने ऋतुराजच्या अनुपस्थितीत चार सामन्यांत कर्णधारपद भूषवले, सांगत आहे महाराष्ट्राच्या यशाचे रहस्य
14 minutes | Dec 8, 2022
CCBK बोल फुटबॉल - How magical Morocco stunned Spain
स्पेनचा आणखी एक पेनल्टी शूटआऊटमधील पराभव स्पेनच्या 'झिरो माईल' मधील एका बारमध्ये पाहिल्यावर अमोल गोखले सांगत आहे त्याचा अनुभव 'बी. यु. भंडारी प्रस्तुत बोल फुटबॉल' मध्ये. त्याचबरोबर अमोल सांगत आहे पोर्तुगाल व मोरोक्कोच्या यशाचं रहस्य आणिकरत आहे भाकीत प्रत्येक उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याचं
COMPANY
About us Careers Stitcher Blog Help
AFFILIATES
Partner Portal Advertisers Podswag Stitcher Originals
Privacy Policy Terms of Service Your Privacy Choices
© Stitcher 2023